ताज्या घडामोडी
चंद्रपूर जिल्ह्याची कमान वसुमना पंत ह्यांच्या हाती – जिल्ह्याच्या इतिहासातील पहिल्या महिला जिल्हाधिकारी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई ने दिनांक:-०२.०४.२०२६ रोजी सह सचिव सुभाष उमराणीकर ह्यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या आदेश क्रमांक अ.शा.प.क्र.एईओ-११२६/५/२०२६/भाप्रसे-१ नुसार चंद्रपूरचे विद्यमान जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. ह्यांच्या जागेवर नागपूर महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत ह्यांना कार्यभार स्वीकारण्याचे आदेश जारी केले असुन त्यांच्या रूपाने जिल्ह्याला प्रथमच महिला जिल्हाधिकारी मिळाल्या आहेत हे विशेष.



