ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संदीप कटकुरवार राज्य शासनाच्या महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

ब्रम्हपुरी निवासी व्यसनमुक्ती क्षेत्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संदीप कटकुरवार यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकतेच मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनात केंद्रीय समाज कल्याण मंत्री ना. रामदास आठवले आणि राज्याचे समाजकल्याण मंत्री ना. संजय शिरसाट यांच्या हस्ते सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांच्या उपस्थितीत संदीप कटकुरवार यांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

   संदीप कटकुरवार हे गेल्या तीस वर्षांपासून सातत्याने व्यसनमुक्ती क्षेत्रात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत आहे.गांधी , विनोबांची सर्वोदय चळवळ , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांशी ते जुळलेले आहे. राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे ते केंद्रीय कार्यकारीणी सदस्य असून ते श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यातही सहभागी असतात. पुरस्कार मिळाल्याबद्दल संदीप कटकुरवार यांचे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, एड. राजेंद्र जेनेकर, श्रीकांत धोटे, विलास उगे, अरविंद पाटील वासेकर, प्राचार्य भाऊ पत्रे, पंडित पुडके, दशमुखे गुरूजी, संजय वैद्य, डॉ. धर्मा गावंडे, प्रा. नामदेव मोरे, देवराव कोंडेकर, एड. सारिका जेनेकर , प्रा.विलास पारखी आदींनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये