दुचाकी स्वरास वाचविण्याचा प्रयत्न एसटी बस उतरली रोडच्या खाली
बस वाहकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवित हानी टळली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- नॅशनल हायवे ३५३डी ब्रह्मपुरी- नागभीड महामार्गावर माहेर फाट्या जवळ आज दुपारी १२ वाजता दरम्यान एस टी बस किरकोळ अपघात झाल्या ची घटना घडली. सुदैवाने, एसटी चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी या घटनेने रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस एम एच १४ एम, एच, २३५३, गडचिरोली- ब्रह्मपुरी- नागपूर जात होती. बसमध्ये जवळपास ४०ते४५ प्रवासी होते. माहेर फाट्याजवळ अचानक एक दुचाकीस्वार मागच्या बाजूने वेगाने बसला ओव्हरटेक करून बस समोरआला. त्याला वाचवण्यासाठी बस चालकाने तातडीने ब्रेक लावत गाडी डाव्या बाजूला वळवली. मात्र, तिथे रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद होता आणि बाजूला खोल खड्डा खणलेला होता. त्यामुळे बसचे नियंत्रण सुटले आणि ती थेट कच्च्या रस्त्याखाली उतरली.
३५३, डी, नॅशनल हायवे मार्गावर सध्या के, सी, सी कंपनीचे पूलाचे काम चालू आहे त्यामुळे वळणरस्ता अरुंद झाला असून, वाहतुकीसाठी जागा कमी उरली आहे. रस्त्यावरील या अरुंद जागेमुळे वाहनांना वळण घेताना किंवा समोरील वाहन वाचवताना अडचण येत आहे.
रस्त्यावर ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत या कारणांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे रस्ता अत्यंत अरुंद झाला असल्याने, समोरून येणारे वाहन वाचवताना सुद्धा चालकांना कसरत करावी लागत आहे. आजच्या घटनेत एसटी बस पलटी होता होता थोडक्यात बचावणी नाही तर मोठी दुर्घटना घडली असती, असे प्रवाशांनी प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.



