ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ वनवासी कल्याण आश्रमसाठी योगदान देण्यासाठी सरसावले शहरवासी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी संलग्न श्री राम नवमी अभियान अंतर्गत विदर्भ वनवासी कल्याण आश्रम च्या माध्यमातून शैक्षणिक प्रकल्प आरोग्य प्रकल्प क्रीडा प्रकल्प स्थायी प्रकल्प राबविण्यात येत आहे या आश्रमासाठी आर्थिक योगदान देण्यासाठी शहरवासी सरसावले असून संपूर्ण शहरात भ्रमण करून लोकसहभागाची हाक देण्यात आल्यानंतर ठीक ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पत्रकार अरुण लताड , सेवा निवृत्त मुख्य लिपिक सतीश कुलकर्णी, सुनील टाकळकर, राजू वगदे यांनी दिली.

  विदर्भ वनवासी कल्याण आश्रम नागपूर व ईतर ठिकाणच्या आश्रमातील रहिवासी यांचे साठी विविध उपक्रम राबविले जातात श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे यांनी 1952 साली छात्रावासाच्या माध्यमातून जशपूर (छत्तीसगड) येथून सुरू केलेले वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य आज संपूर्ण भारतात पोहोचले आहे जनजाती बांधवांचा सर्वांगीण विकास आणि अस्मिता जागरण हा उद्देश समोर ठेवून आज देशभरात 16 427 स्थानी 21 935 प्रकल्पाद्वारे वनवासी कल्याण आश्रमाचे अव्ह्यातपणे सुरू आहे. विदर्भात एकूण 731 प्रकल्प आणि तीस हजार हून अधिक लाभार्थी आहेत. समाजातील सर्व स्तरावरील लोक सहभागातूनच हे कार्य सुरू आहे.

श्रीराम नवरात्र, अक्षय तृतीया, मकर संक्रांति, महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर यथाशक्ती दान देण्याचे आवाहन विदर्भ वनवासी कल्याण आश्रम च्या वतीने करण्यात आल्यानंतर शहरातील प्रत्येक भागात नागरिकांनी या कार्यास सढळ हाताने मदत केली आपली जनजाती संस्कृती परंपरा पूजा पद्धत सोडून धर्म परिवर्तन करणाऱ्या आदिवासींना जनजातीचे आरक्षण मिळू नये या स्वर्गीय कार्तिक उरांव यांनी केलेल्या मागणीसाठी 2026 मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या जनजातीय सांस्कृतिक समागमासाठी कल्याण आश्रमाने देशभरात जनजागरण करण्याचे निश्चित केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये