ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रामनामाने दुमदुमली अवघी भद्रावती नगरी

भद्रावती येथे जय श्रीरामच्या गजरात भव्य शोभायात्रेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           भद्रावती नगरी प्राचीन व धार्मिक शहर म्हणून सर्वदूर ओळखले जाते. सर्वधर्म निरपेक्ष भाव इथला प्रत्येक समाजातील नागरिक जोपासत असतो. प्रभू श्रीराम जन्मोत्सव अवघ्या देशात धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फेविविध ठिकाणी मंदिरात आज रोजी सकाळपासून भजन पूजन, किर्तन प्रबोधन आदींच्या आयोजनातून हा जन्म सोहळा साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. शहरातील विविध संघटना, मंडळ, व्यापारी, राजकीय पक्ष यांनी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिकृती व सहभागी सर्व भद्रवतीकरांना पाणी, अल्पोहार आयोजित करून आपले उत्तरदायित्व पार पाडले.

सायंकाळी गणपती वॉर्ड गवराळा येथून अध्यक्ष शंकर ढेंगळे व युवा मित्र यांचे पुढाकारातून तर भद्रावती येथून श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे विठ्ठल मंदिर देवस्थान इथून भव्य शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील, विविध धर्मातील हिंदू, मुस्लिम, बौद्ध बांधवांनी आपला विशेष सहभाग नोंदविला.

 तहसीलदार राजेश भांडारकर, पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे संयोजक चंद्रकांत गुंडावार, नगराध्यक्ष प्रफुल चटकी, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, हाजी बबन शेठ, समाज सेवक सुशील देवगडे, उपाध्यक्ष सुधीर सातपुते, डॉ. विवेक शिंदे, नकुल प्रशांत शिंदे,अमित गुंडावार, सौरभ घागी,गुरुदेव भक्त विशाल गावंडे , विक्रांत बिसेन, प्रकाश पामपट्टीवार, भारतीय जनता पक्षाचे सर्व समर्थक आदी सह व्यापारी वर्ग , नगर सेवक, नगर सेविका विविध पक्षांचे पदाधिकारी, असंख्य रामभक्त तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नटून थटून सजलेल्या स्त्री, युवती पुरुष, युवक, बाल मंडळी यांच्या श्री रामाच्या घोषणेने परिसर दणाणून गेला. विविध आकर्षक देखावे, चित्तवेधक रोषणाई, फटाक्याची गगनचुंबी आतिषबाजी पाहता भद्रावती मध्ये अयोध्या नगरी अवतरल्याचा अनुभव येत होता.

 नवराष्ट्र निर्माण प्रतिनिधी ने आढावा घेतला असता, ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलिसांनी तहान भूक विसरून सकाळपासून ते मिरवणूक पार पडेपर्यंत कायदा, सुव्यवस्था, व शांतता राखण्याचे उत्तम कर्तव्य पार पाडले त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अथवा कोणतेही गालबोट लागले नाही हे विशेष.

 भद्रावती नगर परिषद सफाई कर्मचारी यांचे दिनानिमित्त विशेष योगदान होते तद्वतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

तहसीलदार राजेश भांडारकर यांनी या तणावाच्या प्रसंगी जगात शांतता लाभो अशी कामना व्यक्त केली. तर पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी धार्मिक उत्सवाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नये असे आवाहन केले.

शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत निघालेल्या शोभायात्रेचा शेवट विठ्ठल मंदिर देवस्थान येथे करण्यात आला.सहकार्य व योगदान देणाऱ्यां चे आभार मानून सोहळ्याची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये