भद्रावती येथील इसम लापता.. कुटुंब चिंताग्रस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक झिंगुजी वार्ड भद्रावती येथील रहिवाशी नामे ईश्वर तिमाजी मेश्राम वय..५९ वर्ष हे दिनांक १८ मार्च २०२६ पासून लापता आहे.
त्यांचा मुलगा नामे नोमेश्वर ईश्वर मेश्राम यांनी स्थानिक पोलिस स्टेशन भद्रावती येथे दिनांक १९ मार्च रोजी तक्रार दाखल केली असता त्यांचे सांगण्यानुसार दिनांक १८ रोजी दुपारी ३.०० वाजता नामे ईश्वर मेश्राम राहते घरून क्रीडासंकुल परिसरात पोहचले ते सायंकाळी ६ ३० वाजेपर्यंत त्या परिसरात होते . मात्र वेळ होऊनही ते घरी पोहचले नाही. चिंताग्रस्त कुटुंबाने नातेवाईक व इतर चौकशी केली असता ते आढळून न आल्याने त्यांनी त्वरित तोंडी तक्रार पोलिस स्टेशन भद्रावती येथे दाखल केली.
सदर इसम ५.२ फूट उंची, वर्ण सावळा, बांधा मध्यम, केस पांढरे, चेहरा गोल, अश्या वर्णनाचा असून अंगात निळे टी शर्ट, व काळया रंगाची लोअर परिधान केले आहे.
सदर व्यक्ती आढळल्यास ९७६५३२२९५३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.


