ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
विद्यार्थिनी अद्विका चावके हिचे नवोदय विद्यालयात यशस्वी चयन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
उमरी मेघे वर्धा : येथील कु. अद्विका बाबुलाल सावके हिची जवाहर नवोदय विद्यालय, सेलू काटे येथे प्रवेशासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल परिसरात तिचे कौतुक होत आहे.
अद्विकाने नवोदय प्रवेश परीक्षेसाठी वैशाली मेंढेवार कोचिंग क्लासेस येथे प्रशिक्षण घेतले होते. तिच्या मेहनतीसोबतच योग्य मार्गदर्शनामुळे तिला हे यश संपादन करता आले.
तिच्या या यशाचे श्रेय अद्विकाने कोचिंग क्लासेसच्या वैशाली मेंढेवार मॅडम, वडील बाबुलाल चावके आणि आई नम्रता चावके यांना दिले आहे.
अद्विकाच्या या यशामुळे तिच्या कुटुंबियांसह शिक्षक व मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


