देऊळगाव राजा साठी विकास निधी कमी पडू देणार नाही _ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नगर परिषद निवडणुकीत शहरवासीयांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मनोज कायंदे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत नगरपरिषद त्यांच्या ताब्यात दिली त्यानंतर शहरात विकासाची कामे सुरू आहेत तर अजूनही मोठ्या प्रमाणात विकासाची कामे करायची असल्याने नगरपरिषदेतील सत्तारूढ गटातील सर्व सदस्यांनी आमदार मनोज कायदे यांचेमार्फत दिनांक 24 मार्च रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व पालक मंत्री मकरंद आबा पाटील यांची भेट घेऊन शहरासाठी विविध विकास कामे करण्यासाठी प्रस्ताव तयार केले असून या प्रस्तावांना मान्यता देण्याची विनंती करून स्वर्गीय अजित दादांनी या शहराला न.प.निवडणूक दरम्यान प्रचार करतांना विनंती केली होती तुम्ही या युवा आमदाराच्या पाठीशी उभे रहा व राष्ट्रवादीच्या ताब्यात नगरपरिषद द्या या ठिकाणी विकासाची गंगा वाहून आणून असे शब्द दिल्याचे सांगताच त्यांनी सुद्धा दादांचा शब्द वाया जाऊ देणार नाही तुमच्या नगरीच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी या शिष्ट मंडळाला दिले.
देऊळगाव राजा नगरपरिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपा यांची सत्ता असून या शहराच्या विकासासाठी युवा आमदार मनोज कायंदे हे सातत्याने प्रयत्नरत असून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी खेचून आणण्यामध्ये त्यांना यश आले आहे दिनांक 24 मार्च 26 रोजी त्यांनी नगर परिषद अध्यक्ष माधुरी शिपने, उपाध्यक्ष वनिता भुतडा,राष्ट्रवादीचे गटनेते प्रदीप वाघ व या नगर परिषदेतील सत्तारूढ गटातील सर्व नगरसेवकांचे शिष्टमंडळ घेऊन राज्याच्या उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार व पालक मंत्री मकरंद आबा पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली.
या भेटीत शहराच्या विकास कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली त्यामध्ये भुयारी गटार योजनेस मान्यता मिळणे व शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेसाठी जी योजना मंजूर केली आहे त्यातील उर्वरित निधी देणे बाबत सांगून रस्ते व नाल्या बांधकाम सोबतच सुसज्ज सांस्कृतिक भवन चे बांधकाम व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आणि सुसज्ज अभ्यासिका साठी निधी देणे बाबत सांगण्यात आले सुनेत्रा पवार यांनी सुद्धा सकारात्मकता दाखवत शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार, नसल्याचे सांगत स्वर्गीय अजितदादा यांनी तुमच्या शहरवासीयांना जो शब्द दिला होता तो मी पूर्ण करेल त्याची ग्वाही दिली यावेळी राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड.नाझेर काझी सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



