मनोज मोडक यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या “प्रजेचा विकास नागरी सन्मान पुरस्कार 2026” अंतर्गत लॉर्ड बुद्धा टीव्हीचे चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मनोज मोडक यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण व निष्पक्ष पत्रकारितेच्या कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला असून, यामुळे भद्रावतीसह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिनांक 28 मार्च 2026 रोजी पुणे येथील रावेत परिसरातील रामकृष्ण बँक्वेट येथे आयोजित स्नेह मेळावा कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार असून मा. श्री ज.वि. पवार, मा. श्री विशाल लोंढे, श्री हेमंत देसाई, श्री शंकर भाऊ जगताप, श्री बाळासाहेब तरस तसेच श्री दिलीप कडलक यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.
या पुरस्कारामुळे मनोज मोडक यांच्या कार्याला नवे बळ मिळणार असून, भविष्यातही ते अधिक जोमाने पत्रकारिता करत समाजातील प्रश्न मांडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भद्रावती परिसरासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.



