ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अतुल कोल्हे यांचा नानक-साई अवार्डने शिर्डी येथे गौरव

शिर्डी लाखो साईभक्तांचे श्रद्धेय स्थान : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     नानक साई फाऊंडेशन या संस्थेतर्फे शिर्डी येथे विशाल साई भक्त संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन साईबाबा शिर्डी संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई व पत्रकार अतुल कोल्हे यांच्यासह मान्यवरांना नानक साई अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.

            शिर्डी लाखो साईभक्तांचे श्रद्धेय स्थान असून, साईबाबांच्या निस्सीम भक्तीमुळे त्याला पंढरपूरसारखेच पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते असे प्रतिपादन भूमाता ब्रिगेड च्या प्रमुख तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या वेळी केले.

शिर्डीच्या नगरअध्यक्षा जयश्री थोरात, शिर्डी संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिर्डीचे प्रथम नगरअध्यक्ष काकासाहेब कोते, माजी उपनगर अध्यक्ष विजय भाऊ कोते, नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख पंढरीनाथ बोकारे, सुरेश वाबळे, साईभक्त दिलीप कंदकुर्ते, राजकुमार चौगुले, नामदेव कुंभार, पंढरीनाथ पगार, सुनील निकम, सरदार प्रितम सिंघ भाटिया, साईप्रसाद खांडरे, सौ. प्रफुल्ला बोकारे, पंकज लोढा, संजय कदम रुईकर, धनंजय उमरीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

शिर्डी हे लाखो साईभक्तांचे श्रद्धेय स्थान असून, साईबाबांच्या निस्सीम भक्तीमुळे त्याला पंढरपूरसारखेच पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते असे सांगून तृप्ती देसाई म्हणाल्या की नानक साई फाऊंडेशन च्या साई भक्त संमेलन व नानक साई अवॉर्ड सोहळ्या चे कौतुक करत साई बाबा यांच्या वर आपली अपार भक्ती आणि श्रद्धा असून जगभरातील लाखो भक्त येथे दर्शनासाठी आणि मानसिक शांततेसाठी येतात.

साईबाबा शिर्डी संस्थान मार्फत भक्तांच्या कल्याणासाठी सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक कार्यात मोठे योगदान दिले जाते. असे प्रतिपादन संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले. साई बाबा यांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी संस्थान सर्वतीपरी सोयी सुविधा प्रामाणिकपणे देते. नानक साई फाऊंडेशन ने शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन आयोजित करून भक्त आणि शिर्डी संस्थानची जवळीक निर्माण करण्याचे कार्य केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

 १९ व्या शतकात साईबाबांनी शिर्डी येथे वास्तव्य करून “श्रद्धा आणि सबुरी” चा संदेश दिला तसेच साईबाबांनी हिंदू आणि मुस्लिम धर्मात एकोपा निर्माण केला असे नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख पंढरीनाथ बोकारे यांनी सांगितले.

शिर्डीत आयोजित केलेल्या विशाल साई भक्त संमेलन मध्ये नानक साई अवॉर्ड प्रदान करण्यात आले.

शिर्डीच्या नगर अध्यक्षा सौ जयश्री विष्णु पंत थोरात, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई पुणे, पत्रकार अतुल कोल्हे भद्रावती (चंद्रपुर), पत्रकार प्रमोद आहेर लोकमत शिर्ड, उद्योजक बालाजी जाधव नांदेड,सरदार अजितसिंघ नीर, ज्येष्ठ संपादक प्रा रामेश्वर बद्दर लातूर, सरदार हरबिर सिंघ हेयर कल्याण, सरदार जयदीप सिंघ जी अरोरा दुबई, ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाऊंडेशन, अशोक मामीडवार उमरी, विष्णु अट्टल उमरी, सुभाष गोरठेकर उमरी, गोपाल राठोड, संभाजी सावंत उमरी,दिलीप जाधव छत्रपती संभाजीनगर, किशोर बाबुलाल चित्ते,धम्मशील सावंत रायगड, मिलिंदकुमार लोहार सातारा, रघुनाथ बेलदार शहादा, सूनील कांबळे कोल्हापूर यांना नानक साई अवॉर्ड देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये