ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थी उपस्थिती वाढविण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सुरू करा _ गुरुदास कामडी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली दिनांक १० व २३ मार्च २०२६ संपन्न झालेल्या अधिसभेत (सिनेट) विद्यार्थी उपस्थिती वाढविण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी विद्यापीठ परिसरातील तसेच संलग्नित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.

यावेळी त्यांनी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे तसेच पारंपरिक हजेरी बुक या दोन्ही पद्धतीने नोंदविण्यात यावी, अशी सूचना मांडली. यामुळे उपस्थितीमध्ये पारदर्शकता येईल व विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण होईल, असे त्यांनी नमूद केले.

तसेच, सर्व महाविद्यालयांमध्ये किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात यावी, अशीही ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. उपस्थितीचे नियम काटेकोरपणे राबविल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेतही वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या संदर्भात मा. कुलगुरूंनी सकारात्मक भूमिका घेत पुढील नव्या शैक्षणिक सत्रापासून बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्याचे आश्वासन दिले. यामुळे विद्यापीठातील उपस्थिती व्यवस्थापनात आधुनिकता येणार असून विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयाकडे विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्गाचे लक्ष लागले असून आगामी सत्रात याची प्रभावी अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये