ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जटपूरा गेट येथे रामनवमी शोभयात्रेचे जल्लोषात स्वागत

युवा मोर्चाच्या भव्य आयोजनाने लक्ष वेधले

चांदा ब्लास्ट

 रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त शहरातून निघालेल्या भव्य यात्रेचे जटपूरा गेट येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. या निमित्ताने आकर्षक आणि भव्य व्यवस्था उभारण्यात आली होती, ज्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार यांनीही उपस्थिती दर्शवली. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रसाद किशोर जोरगेवार तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते.

  या स्वागत सोहळ्यात प्रभु श्रीरामांच्या भक्तीमय गाण्यांनी वातावरण भारावून गेले होते. विशेष लाईटिंग व्यवस्थेमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी युवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत डिजेच्या तालावर नाचत रामभक्तीचा जागर केला. “जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या भव्य आयोजनामुळे जटपूरा गेट परिसरात भक्ती, उत्साह आणि तरुणाईचा जोश यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये