डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थ्यांना निरोप
कार्यक्रमाप्रसंगी कायदेविषयक संदर्भात पोलिसांनी दिले माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी येथील नॅशनल कॅडेट कोर्स एनसीसी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयामध्ये करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाची प्राचार्य देवेशजी कांबळे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सदस्य प्रा.डॉ. स्निग्धा कांबळे, प्रा.सरोज शिंगाडे तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व मुख्य मार्गदर्शक म्हणून पोलीस हवालदार अरुण पिसे होते .
कार्यक्रमाचे वेळी एनसीसी चे महत्व व एनसीसीच्या विद्यार्थ्यांना पोलिस दलामध्ये सैन्य दलामध्ये भरतीचे वेळी किती महत्त्व प्राप्त आहे तसेच देशावर येणाऱ्या आणीबाणीच्या वेळी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी एनसीसी चे विद्यार्थी हे नेहमीच पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असतात एनसीसी चे महत्व त्यांच्या ब्रीदवाक्य मध्ये आहे शिस्त तसेच सहनशीलता कशी असायला पाहिजे यामध्ये गेलेला आहे.
असे मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले व कार्यक्रम कार्यक्रमाचे वेळी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठा भावनिक देण्यात पार पाडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला त्यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्ती केले कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाच्या एनसीसी बटालियनचे विद्यार्थी यांनी केले. असून आभार प्रदर्शन सुद्धा या विद्यार्थ्यांनीच केले आहे अशा प्रकारे हा कार्यक्रम आज दिनांक 25 मार्च 2026 ला सकाळी बारा वाजता सुरू होऊन दुपारी दोन वाजता संपला कार्यक्रमात ची वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक वर्ग सर्व एनसीसी चे विद्यार्थी उपस्थित होते..



