“गांजा अंमली पदार्थाची तस्करी करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मा. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 24 मार्च 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथक पेट्रोलिंग करीत असतांना, मुखबीरतर्फे मिळालेल्या खात्रीशीर खबरेवरून पोलीस स्टेशन सेलु हद्दीतील मौजा हिंगणी वार्ड नं. 01 येथे गिताबाई हरिभाऊ चुटके हिचे राहते घरी रेड केला असता, तेथे नमुद महिला व तिचा नातजावई रौशन कुमार उर्फ रोशनसिंग तुलसी सहाणी रा. अमृत कॉलनी लुधियाना पंजाब ह.मु. हिंगणी असे संगणमताने गांजा अंमली पदार्थांची विक्री करीत असतांना, मोक्कावर रंगेहाथ मिळुन आले. त्यांचे ताब्यातुन 01 किलो 60 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ व एक मोबाईलसह जु.कि. 56,500 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, सदर गांजाचा माल गणेशनगर सातगाव बुट्टीबोरी येथील मधु गुजरकर नावाचा ईसमाने दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, तिन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. सेलु येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, स.पो.नि. आशिषसिंग ठाकुर, पो.उपनि. प्रकाश लसुंते, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक, प्रिती धवळे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली



