कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे शेतीदीन व चारा केंद्र प्रक्षेत्र भेट कार्यक्रम उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा (वर्धा) येथे कार्यरत असलेल्या जिल्हा नियोजन अंतर्गत जिल्हा परिषद वर्धा मार्फत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे चारा केंद्र विकसित करणे प्रकल्पातून कृविके सेलसुरा प्रक्षेत्रावर चारा केंद्र विकसित केले असून या अंतर विविध चारा हायब्रीड नेपियरची लागवड करण्यात आली आहे. या चारा केंद्रातून शेतकरी पशुपालकयांना चारा बेण्याचे वाटप देखील सुरू आहे. कृविके, सेलसुरा येथील प्रक्षेत्रावर लागवड केलेल्या विविध चारा पिकांची माहिती व प्रक्षेत्र भेट तसेच लागवड, लागवडीपशात व्यवस्थापन, खत व्यवस्थापन संदर्भात शेतकरी पशुपालकांना माहिती होण्यासाठी शेतीदीन व चारा केंद्र प्रक्षेत्र भेट कार्यक्रम कृविके, सेलसुरा चे प्रमुख डॉ. जिवन कतोरे, यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे चारा पिकांचे प्रक्षेत्र भेट तसेच चारा पिकांच्या विविध जाती व लागवड याविषयी मार्गदर्शन डॉ. सचिन मुळे, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) कृविके सेलसुरा यांनी केले. चारा पिकांचे नैसर्गीक रित्या खत व रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन डॉ. निलेश वझीरे, विषय विशेषज्ञ (पिकसंरक्षण) यांनी केले. चारा पिकांची पिकांची लागवड व कापणी या विषयावर मार्गदर्शन डॉ. भरती तिजारे विषय विशेषज्ञ (कृषि विद्या) यांनी केले.
या प्रसंगी दिघी गावचे प्रगतशील शेतकरी श्री. आशिष दिघीकर यांनी एकात्मिक पशुधन आधारित शेती पूरक व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन केले या प्रसंगी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाची शुभा वाढवली. शेतकरी पशुपालकांनी चारा प्रक्षेत्रास भेट देऊन येत्या खरिप मध्ये चारा बेणे नेऊन चारा पिकांची लागवड करून पशूंसाठी वापर करण्याचे आश्वासन दिले.



