ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस ४ महिने कारावास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी लहु देवरावजी पळसराम हा आंजी अंदोरी, तालुका देवळी, जिल्हा वर्चा येथे कुटूंबासह राहतो व राजू डगवार याचे ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतो. आरोपी शंकर गणेश राउत हा देखील आंजी अंदोरी येथील रहिवासी आहे. दिनांक ०५.०९.२०१५ रोजी संध्याकाळी ८.३० वाजताचे दरम्यान फिर्यादी जेवण करुन धराबाहेर रस्त्यावर बसला होता. त्यावेळी आरोपी शंकर राउत त्याचेजवळ आला व म्हणाला की, ‘तू दिनांक ०१.०९.२०१५ रोजी महिला मंडळ अध्यक्षा व दारुबंदी सदस्यासोबत माझी दारु पोलिसांना का पकडून दिली व बैलबंडीच्या उभारीने फिर्यादीच्या डोक्यावर मारहाण करुन जखमी केले. सदर मारहाणीमुळे फिर्यादीचे डोके फुटले व रक्त निघू लागले.

तसेच आरोपीने सदर उभारीने फिर्यादीच्या उजव्या हातावर व पोटावर मारहाण केली होती. आरोपी हा गावात दारुची विक्री करतो व फिर्यादी हा दारुबंदी महिला मंडळाचा सदस्य असल्याने आरोपीने बैलबंडीच्या उभारीने त्याला मारहाण केली व शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुध्द पोलीस ठाणे देवळी येथे फिर्याद दाखल केली होती. सदरील फिर्यादीच्या आधारे पोलीस ठाणे देवळी यांनी आरोपीविरुध्द गुन्हा क्र. १७६/२०१५ कलम ३२४ व ५०४ भा.दं. वि. प्रमाणे दाखल केला व तपासंती आरोपीविरूद मुख्य न्यायदंडाधिकारी वर्धा यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. सदर खटल्यात अभियोग पक्षातर्फे लहु देवरावजी पळसराम फिर्यादी /जखामी, गजानन देवरावजी पळसराम, दिपक विठ्ठलराव पोहणकर, कडूबा भास्कर मुंडे तपासी अधिकारी, डॉ. दिनेश हरसिंग राठोड व रामभाउ शंकर लोंढे असे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारपक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून मुख्प न्यायदंडाधिकारी श्रीमती मृणाल डोईफोडे आरोपी शंकर गणेश राउत पास फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २४८ (२) प्रमाणे भा.दं. वि. च्या कलम ३२४ व ५०४ चे शिक्षापात्र गुन्हयाकरीता सिध्द दोषी अपराधी घोषीत करण्यात आले व आरोपीस भारतीय दंड संहिताचे कलम ३२४ करीता ४ महिने साध्या कारावासाची व रक्कम रुपये १०००/- दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरोपीने सदर रक्कम रुपये १०००/- दंड न भरल्यास १५ दिवसांची अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा भोगावयाची आहे. आरोपीस भारतीय दंड संहिताचे कलम ५०४ करीता १ महिना साध्या कारावासाची व रक्कम रुपये ५००/-दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरोपीने सदर रक्कम रुपये ५००/- दंड न भरल्यास ७ दिवसांची अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा भोगावयाची आहे.

अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता समीर ढुंगे व ज्योती लकडे व पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार बोबडे यांनी कामकाज पाहिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये