पोलीस अधीक्षक वर्धा यांचा अभिनव ‘संवाद’ उपक्रमः काकडधरा येथे नागरिकांच्या समस्यांचे केले निराकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यात विश्वास, सहकार्य आणि समन्वय अधिक दृढ करण्यासाठी वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात संवाद’ हा अभिनव उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आव पोलीस स्टेशन खरांगणा हद्दीतील मौजा काकडभरा (ता. आर्वी) येथे विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकाभिमुख पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल गुन्हेगारी नियंत्रण आणि शांतता सुव्यवस्था राखण्यास मैलाचा दगड ठरत आहे. आतापर्यंत जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत २० संवाद उपक्रम वयशस्वीरीत्या पार पडले असून, त्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये विश्वास शिरसाट, उपविभागीय अधिकारी आर्वी, श्रीमती वंदना कासोले, उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव, सी. गीतांजली निक्रम, प्रकल्प अधिकारी (आदिवासी विभाग), संजय मिसाळ, उपविभागीय अभियंता (सा.बा. विभाग) नितीन उके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा यांच्यासह तहसील कार्यालय, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन आणि वनविभाग व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते तसेच नमूद गावातील संपर्ण नागरिक सुद्धा उपस्थित होते.
पोलीस अधीक्षकांनी गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांशी भेट चर्चा करून त्यांच्या सुरक्षाविषयक अडचणी जाणून घेतल्या केवळ पोलीस विभागथ नव्हे, तर इतर शासकीय विभागांचे कील प्रमाणे प्रतिनिधींनीही उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारीचे जागेवरच निराकरण करण्याचा प्रयत्न केला.
भीत्रा काकडभरा या गावाला सन २०१७ साली पाण्याचा योग्य निचरा केल्याबाबत पाणी फाउंडेशनया संस्थे मार्फत प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता अशा गावाचा नावलौकिक वाढविणाऱ्या ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक साहेबांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
“नागरिकांनी निर्भयपणे आपल्या समस्या पोलिसांसमोर मांडाव्यात. पोलीस प्रशासन आणि जनता बांच्यातील अंतर कमी करणी आणि गुन्हेमुक्त समाजाची निर्मिती करणे हाच या संवाद उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वंदना कारखेले यांच्या देखरेखीत खरागणाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, सपोनि संदीप कापडे, महिला पोलीस अंमलदार शुभांगी जाधव, आणि पोलीस अंमलदार मनीष श्रीवास, सूरज शुक्ला यांनी विशेष परिश्रम घेतले.



