ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांना 100 टक्के प्रोत्साहन

 उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांची उद्योजकांसोबत चर्चा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- हा औद्योगिक जिल्हा आहे. वीज, पाणी व इतर मुलभुत सुविधा येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने अनेक उद्योगांची चंद्रपुरात यायची तयारी आहे. सद्यस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील उद्योगांना 100 टक्के प्रोत्साहन असून चंद्रपूरला 80 टक्के आहे. आता मात्र गडचिरोलीप्रमाणेच चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांनाही 100 टक्के प्रोत्साहन देण्याचा निर्णय उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चंद्रपूर येथील बैठकीत घेतला.

बुधवारी (दि.12) जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योगांच्या प्रतिनिधींसोबत डॉ. सामंत यांनी जिल्ह्यातील उद्योगांबाबत चर्चा केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. पुढे उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी 65 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर करीता सुध्दा 360 कोटी रुपये मंजूर झाले असून राज्य शासनाच्या वतीने 180 कोटी, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या वतीने 90 कोटी तर स्थानिक खनिज विकास निधीतून 90 कोटी देण्यात येणार आहे.

औद्योगिक क्षेत्रात आता 20 टक्के जागा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) आरक्षित ठेवण्याचे धोरण राज्य शासनाने ठरविले आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात 20 टक्के जागा एमएसएमईसाठी आरक्षित केल्याने छोट्या छोट्या उद्योगांना चालना मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील काढून घेतलेले 18 भूखंड त्वरीत सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

जिल्ह्यातील उद्योग चालले तरच बेरोजगारीचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पायाभूत सुविधा करण्यावर आपला भर राहील. उद्योगांचे नुकसान होऊ देणार नाही. कृषी आधारित उद्योगासाठी कृषी विभागाने उद्योग विभागाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा उद्योगांनासुद्धा प्रोत्साहन देण्यात येईल. उद्योगाच्या इकोसिस्टीम मध्ये येथील स्थानिकांना रोजगार देण्याचे धोरण आहे. मोठ्या उद्योगांना लघु उद्योगांकडून कडून काय अपेक्षा आहे, याबाबत उद्योगांच्या प्रतिनिधींची एक बैठक घेण्यात येईल. दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेत सामंजस्य करार झालेले दोन उद्योग भद्रावती परिसरात आले आहेत. यात न्यू एरा क्लिनटेक एनर्जी आणि ग्रेटा एनर्जी या कंपन्यांचा समावेश आहे, असेही उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री. पोटे, मुख्य अभियंता राजेश जंजाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती कारले, चंद्रपूरचे प्रादेशिक अधिकारी निशांत गिरी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनमोल कोरे यांच्यासह एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधूसुदन रुंगठा, न्यू एरा क्लिनटेकचे सचिन धात्रक, ग्रेटा एनर्जीचे वैभव कालकुटे, लॉयड्स मेटलचे प्रशांत पुरी, संदीप भाटिया, सुबोध कासुरकर, मिनाक्षी वाळके आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये