ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना ची वार्षिक आमसभा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा :- तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा ,संलग्नता बुलडाणा जिल्हा सेवा निवृत्तांची कल्याणकारी संघटना बुलडाणा, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा यांची ३२वी वार्षिक आमसभा 11 ऑगस्ट रोजी विरंगुळा भवन आठवडी बाजार परिसर देऊळगाव राजा येथे बुलढाणा जिल्हा सेवानिवृत्त कल्याणकारी संस्थेचे जिल्हा अध्यक्ष डॉ मधुकरराव प-हाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली,प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सहसचिव प्रा रामदास शिंगणे, उपाध्यक्ष तेजराव सावळे,व विनायक खराटे, सेवानिवृत्ती डेप्युटी कमांडर बीएसएफ, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ मार्गदर्शक रावसाहेब पुजारी,मानद संचालक ज्येष्ठ मार्गदर्शक गोविंदराव अहिरे ,, देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री बळीराम मापारी, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजाचे अध्यक्ष श्री प्रकाश खांडेभराड, सचिव गोविंद बोरकर, मेडिकल असोसिएशन चे संचालक डॉ अशोक काबरा , जेष्ठ नागरिक संघटना चे कार्याध्यक्ष प्रा विनायक कुळकर्णी होते , यावेळी.संघटनेचे संघटक प्रकाश अहिरे यांचा उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून डॉ मधुकरराव प-हाड यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

संघटनेचे संघटक श्री मधुकरराव धुळे सर मागिल वर्षीच्या आमसभेचे इतिवृत्त वाचून दाखवले,व त्यास मान्यता देण्यात आली,.श्री.अरुण सपाटे यांनीव सन२०२५-२६चा ताळेबंद व२६-२७चे अंदाज पत्रक वाचून दाखवले, व मंजूर करण्यात आले,श्री.गोविंद बोरकर सचिव यांनी मागिल वर्षी झालेल्या उल्लेखनीय बाबींचे सादरीकरण केले.. कार्यक्रमाला प्रा.अशोक डोईफोडे, राम चौधरी, रमेश नरोडे,का.पु.मोरे, प्रा सतिश कुळकर्णी, दंदाले काका,शांति लाल निरफळे, पंडितराव पाथरकर,जोशी साहेब, सन्मती जैन, उद्धव राव मुळे, विष्णु बुलबुले , रमेश गवई, सुशील हनुमंते ,नंदलाल शर्मा, साहेबराव डोळस, प्रा.टेकाळे, भालेराव गुरुजी,भ.बा.खरात, श्रीमती सुभद्राबाई बोरसे मॅडम, प्रा. अमोल सुरळीकर , घनश्याम भंडारे, मार्कंड अप्पा घिके, रामदास कुलथे, विश्वनाथ खंदारकर , काजी सय्यद इस्माईल, अनिल सुनगत , विनोद जाधव, के के काकड, भदंत महाथोरो खरात,तथा इतर सदस्य उपस्थित होते , यावेळी शांतीलाल जी निरफळे, नंदलाल शर्मा, डॉक्टर अशोकजी काबरा, भंते संगपाल थेरो ( म्हस्के,) यांनी आपले विचार व्यक्त केले केले, शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पऱ्हाड साहेब यांनी उपस्थित सर्वांना सेवानिवृत्तांनी कसे जीवन जगावे याबद्दल सखोल व वस्तुनिष्ठ मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे संचालन प्रा विनायक कुळकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव गोविंदराव बोरकर यांनी केले राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये