जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग वर्धा तर्फे जागतिक ग्राहक दिन साजरा
न्यायाधीश श्रीमती वैशाली गजभिये व श्री. राजु रणवीर उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक २४ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता दरम्यान जिल्हा समाज कल्याण सभागृह, सेवाग्राम रोड वर्धा येथे १५ मार्च, २०२६ जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले न्यायाधीश श्रीमती वैशाली आर. गजभिये, अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच वर्धा मा. विवेक दा.देशमुख, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वर्धा, मा. सतिश देशमुख, अध्यक्ष, अ.भा.ग्रा. पंचायत जिल्हा वर्धा, मा. सौ. उषा फाले, अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद वर्धा, मा.त्र्यंबक पुष्पलवार, अ.भा. ग्रा. पंचायत तालुका, वर्धा, मा. विनोद पोटे, सचिव अखिल भारतीय ग्राहक परिषद जिल्हा वर्धा, अजय भोयर, सचिव अखिल भारतीय ग्राहक कल्याण विदर्भ शाखा, मा. अनिल मिश्रा, अ.भा. ग्रा.प.. विदर्भ प्रांत रोजगार सृजन प्रमुख, किशोर मुटे, विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य तथा सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद वर्धा, मा. अॅड श्रीमती प्रिती साहु, विधी सल्लागार, वर्धा, आणि श्री. राजू रणवीर, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सदस्य सचिव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद वर्धा, यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर वैधमापन विभाग वर्धा यांचे अध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
तसेच, राजु रणविर, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्धा, श्री. अजय साबळे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी वर्धा, श्री. चंद्रशेखर वानखेडे धान्य खरेदी अधिकारी, वां व हे सर्व अधिकारी/ कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी व ग्राहक असे सर्व सदर कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती कल्याणी मुटे यांनी ग्राहक गीताने केली. सदर कार्यक्रमाचे संचालक श्रीम. शिवलीला संजय भोसीकर, जि.पु.अ कार्या वर्धा व प्रस्ताविका राजु रणविर, जि.पु.अ वर्धा यांनी केले आहे.
तसेच सदर कार्यक्रमात उपस्थित प्रमुख अतिथी यांनी जागतिक ग्राहक दिन या विषयावर आप आपले मनोगत व्यक्त केले व ग्राहकांमध्ये जनजागृती करिता प्रोत्साहन केले, व कार्यक्रमाअंती श्रीम. सारिका वाघ, तह.कार्या वर्धा यांनी सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करुन सदर कार्यक्रम संपला असे जाहिर केले.


