ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभूर्णा येथे फिश मार्केट व नाट्यगृहावर सोलर पॅनलसाठी ३२.६८ लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

चांदा ब्लास्ट

सार्वजनिक ठिकाणी वीज खर्चात बचत; पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना

चंद्रपूर :- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून पोंभूर्णा शहरातील फिश व मटन मार्केट तसेच खुले नाट्यगृह येथे सोलर पॅनल बसविण्यासाठी ३२ लक्ष ६८ हजार रुपये कामांना जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ अंतर्गत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

ऊर्जा स्वावलंबनाचा आदर्श निर्माण करण्याच्या दृष्टीने आ. मुनगंटीवार सातत्याने कार्यरत असून, यापूर्वी उथळपेठ गावाला १०० टक्के सौरग्राम म्हणून विकसित करण्यास त्यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर चिंतलधाबा गावासाठीही सौरग्राम प्रकल्पांतर्गत १ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर करून त्यांनी ऊर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी साधली.

आता पोंभूर्णा शहरातील फिश मार्केट व नाट्यगृहावर सोलर पॅनल उभारणीस मंजुरी मिळवून देत त्यांनी स्वच्छ, शाश्वत व किफायतशीर ऊर्जेचा वापर वाढविण्याचा दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन पुन्हा अधोरेखित केला आहे. या उपक्रमामुळे वीजबिलात बचत होणार असून पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे पोंभूर्णा तालुका ऊर्जा स्वावलंबनाकडे वाटचाल करणारा आदर्श ठरत आहे.

सदर कामांसाठी निधी उपलब्ध झाल्याने लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणीस प्रारंभ होणार आहे. या प्रकल्पामुळे सार्वजनिक ठिकाणांवरील वीज खर्चात लक्षणीय बचत होईल, तसेच हरित ऊर्जेचा वापर वाढीस लागेल. परिणामी पर्यावरण संवर्धनाला हातभार लागून पोंभूर्णा शहर शाश्वत विकासाच्या दिशेने ठोस पाऊल टाकणार आहे.

पोंभूर्णा तालुक्याचा सर्वांगीण विकास

पोंभूर्णा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पुढाकार घेत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारले आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून फिश मार्केट व खुले नाट्यगृहाची उभारणी, ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर, नगरपंचायतची भव्य इमारत, विश्रामगृह, श्री राजराजेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती, माळी समाजासाठी सभागृह, आदिवासी वसतिगृह, वीर बाबूराव शेडमाके सभागृह, पत्रकार भवन, जिम तसेच पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या इमारती अशा विविध कामांमुळे तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे.ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक विकास यांचा समतोल साधत पोंभूर्णा तालुका प्रगतीच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचे या उपक्रमांतून स्पष्ट होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये