ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. एस.आर.रंगनाथन जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :- गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे दिनांक 12 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाद्वारे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची 134 वी जयंती राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरी करण्यात आली.

याप्रसंगी गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे डॉ.प्रशांत पुराणीक, प्रा. आशिष पईनकर, ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. सचिन कणेंवार, प्रा. प्रकाश लालसरे प्रा. स्वप्निल डुमरे,प्रा. रत्नाकर बोभाटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सदर कार्यक्रमात प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे यांनी डॉ एस. आर.रंगनाथन यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला व त्यांच्या प्रयत्नाने आज विशेषतः महाविद्यालय व विद्यापीठ ग्रंथालय समृद्ध होत आहे असे मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुशांत खिरटकर, सविन मडावी,शालिक कांबळे, संतोष चौधरी,प्रशांत नवले व अनिता बुरान यांनी विशेष प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये