ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाकाली यात्रा तयारीची पाहणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :– सुरू असलेल्या महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या तयारीची पाहणी रविवार, २२ मार्च रोजी करण्यात आली. सध्या भाविकांची गर्दी तुलनेने कमी असल्यामुळे सोईसुविधांमध्ये कोणतीही अडचण जाणवत नसली, तरी येत्या काही दिवसांत भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता लक्षात घेता यात्रेशी संबंधित सर्व कामे वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमहापौर प्रशांत दानव यांनी यावेळी दिले.

या पाहणीदरम्यान आयुक्त अकुनुरी नरेश, संबंधित प्रभागातील नगरसेवक तसेच मनपाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी यात्रेसाठी करण्यात येणाऱ्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अतिरिक्त सफाई कर्मचारी नियुक्त करणे, कचरा व्यवस्थापनासाठी नियमित संकलन व विल्हेवाट व्यवस्था सुरळीत ठेवणे, पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, तसेच यात्रेच्या परिसरात अखंड व सुरळीत प्रकाश व्यवस्था ठेवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

तसेच मुख्य रस्ते व अंतर्गत मार्गांची दुरुस्ती, तात्पुरत्या पार्किंग व्यवस्थेची आखणी, वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना, तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी वैद्यकीय सुविधा व नियंत्रण कक्ष (Control Room) कार्यान्वित ठेवण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. नागरिकांच्या सुरक्षितता व सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही उपमहापौरांनी दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये