ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात शहीद दिन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये शहीद भगत सिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या स्मृती प्रित्यर्थ शहीद दिन साजरा करण्यात आला.

आजच्या दिवशी या तिन्ही महात्म्यांना इंग्रजांकडून फाशी देण्यात आली होती. तेव्हा त्यांचे वय उरतेपुरते २३ वर्षाचे होते खास करून भगतसिंग याचे देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे हे देशभक्त खऱ्या अर्थाने राष्ट्र संरक्षक होते. आपल्या जिवाचीही पर्वा न करता हसत हसत फासावर चढले. त्यांच्या कार्याला कोटी कोटी सलाम. महाविद्यालयात त्यांच्या कार्याची आठवण जिवंत राहावी यासाठी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. रामकृष्ण पटले सर, मुख्य वक्ता म्हणून प्रा. चेतन वैद्य व प्रमुख अतिथी म्ह्नणून डॉ. अनिस खान सर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन ग्रंथपाल, डॉ. मनोहर बांदरे व आभार प्रदर्शन IQAC चे समन्वयक डॉ. उत्कर्ष मुन यांनी केले.याशिवाय डॉ. संदीप घोडिले. श्री बबन पोटे,संजीव पिंपळकर, रमेश मांडवकर, व इतर शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये