ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीत नवोदय परिक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांचा सत्कार

न्यू जनरेशन कोचिंगचे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

     प्रत्येक आईवडिल आपल्या मुलाच्या उज्वल भविष्याकरिता जिवाचे रान करतात. आपल्या मुलाने खूप शिकावं, मोठं व्हावं. हि पालकांची स्वाभावीक अपेक्षा असते. काही वेळी आपण मुलांकडून आपल्याच इच्छेनुसार अपेक्षा व्यक्त करतो. पण अनेकदा ते चुकीचे ठरते. मुलाला कुठल्या क्षेत्रात रस आहे. याची माहिती घेत पालकांनी त्याला त्याचे स्वतंत्र क्षेत्र निवडण्याची संधी दयावी. दडपणविरोधी शिक्षणप्रणाली हि आपल्या समस्त विध्यार्थी वर्गासाठी हिताची आहे असे प्रतीपादन कृषी विभागाचे मंडळ अधिकारी किशोर टोंगलवार यांनी केले. गोंडपिपरी येथील एल.जे.के महाविघालयात जवाहर नवोदयच्या परिक्षेत यशश्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

    पत्रकार संदीप रायपूरे,सामाजिक कार्यकर्ते विनोद दुर्गे, प्रमोद झाडे, प्रा.महेद्र अक्कलवार, पंकज मडावी, संदेश गांवडे, रूपेश नैताम, वैभव आस्वले, हर्षल मेश्राम, गौतम खोब्रागडे, दामीनी मेश्राम, ईश्वर मेश्राम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावर्षी गोंडपिपरी तालुक्यातील ९ विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय ची परिक्षा उत्तीर्ण केली. त्यापैकी ६ विध्याथी हे न्यू जनरेशन कोचींग क्लासचे होते.

      स्वदिप झाडे, शिवम टोंगलवार, परिधी आस्वले, स्वराश गावंडे, अव्दिती मडावी, अथर्व नैताम हे सहा विद्यार्थी यात प्रचंड परिश्रम घेत यशश्वी झाले. त्यांच्या या यशाबाबत त्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम घेण्यात आला. शाल,श्रिफळ देत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अनेक मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून विध्याथ्र्यांना प्रोत्साहन दिले. सोबतच प्रचंड मेहनत घेत सहा विद्यार्थ्यांना यश मिळवून देणा-या हर्षल मेश्राम व गौतम खोब्रागडे यांचे मान्यवरांनी अभिनंदन करित आभार मानले. आपल्या मार्गदर्शनातून हर्षल मेश्राम यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक हितासाठी आपण कटिबध्द असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला पालकांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये