ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना व जिवती तालुक्यात क्षय रुग्णांना पोषण आहार किट वाटप 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

24मार्च जागतिक क्षय रोग दिन या निमित्त 2026या वर्षी मार्च महिन्यात कोरपना व जिवती तालुक्यातील क्षय रूग्णा ना मागील 16 दिवसा पासून पोषण आहार किट वाटप विगवेळ्या ठिकाणी देण्यात येत आहे आजाराचे गांभीर्य लक्षात घेता

क्षयरोग एक संसर्गजन्य आजाराबरोबर एक सामाजिक समस्या आहे क्षयरोग भारतातील सर्वात मोठे सार्वजनिक आरोग्य आव्हाना पैकी एक असून दरवर्षी 26 लाख नवीन क्षय रुग्ण निर्माण होऊन त्यापैकी ४.४ लाख रुग्ण दगावतात शासन स्तरावर रुग्णाला औषधोपचार मोफत मिळतो तसेच एक हजार रुपये दर महा मिळतो परंतु यांना सकस आहार पोषण युक्त मिळावा यासाठी शासनाने आव्हान केले सामाजिक संस्था, सामाजिक कार्याची आवड असणारे व्यक्ती यांनी मदत करावी व टीबी रुग्ण यांना पोषण आहार किट द्यावी त्यांना सात प्रतिसाद म्हणून आता पर्यंत जिवती तालुका तील रुग्ण व कोरपना तालुक्यातील टीबी रुग्णांसाठी पोषण आहार किट *आरोग्य कर्मचारी* जिवती व कोरपना यांचे माध्यमातून टीबी रुग्णांन पर्यंत पोहचवण्यात येत आहे.दिनांक 16/03/2026 ला ता आ अधिकारी कार्यालय येथे अंबुजा फाऊंडेशन कडून टी बी रुग्णांना पोषण आहार किट वाटप करण्यात आली त्या प्रसंगी कार्यक्रम मध्ये मा. डॉ टेंभे सर तालुका आरोग्य अधिकारी जिवती यांनी फूड बास्केट देणारे कोरपना जिवती तालुक्यातील दानशूर व्यक्ती परिवार व मा जितेंद्र बैस अंबुजा फाऊंडेशन यांचे आभार मानले.

या वेळेस आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमा चे संचालन श्री ठमके यांनी केले .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये