ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खापरी परिसरात सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   वनपरिक्षेत्र हद्दीतील चांदा आयुध निर्माणीच्या इंद्रप्रस्थ गार्डन मागील खापरी येथील रामटेके सोसायटीलगत चार ते पाच महिने वयाचे बिबट्याचे पिल्लू जिवंत अवस्थेत अस्वस्थ स्थितीत आढळून आले. झाडांचा पाला-पाचोळा खाल्ल्यामुळे त्याची प्रकृती बिघडल्याचे प्राथमिक निरीक्षणात आढळले.

सदर बिबट्याचे पिल्लू आईपासून दुरावल्यामुळे त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व पिल्लाला ताब्यात घेऊन उपचारासाठी चंद्रपूर येथील टीटीसी केंद्राकडे हलविण्यात आले.

मात्र, उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर करण्यात आलेल्या उत्तरीय तपासणीत बिबट्याच्या घशात पाला-पाचोळा अडकलेला आढळून आला. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.

पुढील कार्यवाहीनुसार बिबट्याच्या मृतदेहाचे चंद्रपूर येथील टीटीसी केंद्रात नियमानुसार दहन करण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, वनरक्षक संदीप पारवे तसेच इतर वनमजुरांनी पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये