बाल समाज प्रबोधनकार सिफा पवार यांची ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार–२०२६’ साठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार–२०२६’ साठी भद्रावती येथील बाल समाज प्रबोधनकार कु. सिफा पवार यांची निवड करण्यात आली आहे.
सन २००७ पासून सामाजिक परिवर्तन, न्याय व लोकहिताच्या विविध प्रश्नांवर कार्यरत असलेल्या या संस्थेमार्फत दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. डॉक्टर, वकील, पत्रकार, समाजसेवक, शिक्षक, अभियंते तसेच कृषी व इलेक्ट्रॉनिक्स मिडिया क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा या पुरस्कारासाठी समावेश करण्यात येतो.
कु. सिफा पवार या बाल समाज प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
सदर पुरस्कार येत्या २९ मार्च रोजी लातूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या एका पुरस्कार समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने हा पुरस्कार समाजसेवेची भावना वृद्धिंगत व्हावी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दिला जात असल्याची माहिती देण्यात आली.



