आरोग्य शिबिर उपक्रम नसून भावनेशी जुळलेला कुटुंब सोहळा – आ. जोरगेवार
“अम्मा का टिफिन” परिवारातील सदस्यांची निशुल्क आरोग्य तपासणी

चांदा ब्लास्ट
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई गजानन जोरगेवार उर्फ “अम्मा” यांच्या इच्छापूर्तीने आमदार किशोर जोरगेवार यांनी सुरू केलेल्या “अम्मा का टिफिन” या उपक्रमांतर्गत सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डोळ्यांची तपासणी करून चष्म्यांचे वाटप करण्यात आले. हे आरोग्य शिबिर उपक्रम नसून भावनेशी जुळलेला कुटुंब सोहळा असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
या प्रसंगी “अम्मा का टिफिन” उपक्रमाच्या संयोजिका सविता दंढारे, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश देवतळे, प्रसाद जोरगेवार, तुषार सोम, बलराम डोडानी, महामंत्री रवी गुरनुले, वंदना हातगावकर, गटनेते चंद्रशेखर शेट्टी, घुघूस शहर अध्यक्ष संजय तिवारी, नगरसेवक संजय कंचर्लावर, रॉबिन बिस्वास, भालचंद्र दानव, आशिष मासीरकर, सुधीर कारंगल, नगरसेविका आशा देशमुख, ज्योती जीवणे, सायली येरणे, विमल कातकर, स्वप्नील डुकरे, प्रवीण गिलबिले, ओमेश आयलू, प्रलय म्हसाखेत्री, राकेश नाकाडे, राम जंगम, सुजाता कापसे, शिरीष गोगुलवार, भाग्येश्री हांडे, नीलीमा वनकर, कल्पना शिंदे, कौसर खान, अल्का मेश्राम, हेमलता खोब्रागडे, सुप्रिया येरकल, सविता ब्राम्हणे, सपना सातपुते, सुषमा तपासे, सोनाली इटनकर आदींची उपस्थिती होती.
‘राहो न कोणी भुकेला उपाशी, अम्मा का टिफिन येईल घराशी’ या संकल्पनेतून चंद्रपूर शहरात सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत दररोज आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी बनविलेले जेवण गरजूंना घरपोच पोहोचविले जाते. यात उपक्रम सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकदाही खंड पडलेला नसून नियमितपणे सेवा कार्य सुरू आहे. या माध्यमातून गरजूंना मायेचा घास दिला जात आहे.
याच उपक्रमाच्या पुढील टप्प्यात “अम्मा का टिफिन” कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी नियमित आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, डोळे आदींची तपासणी करण्यात येते. दरम्यान, आज गुरुवारीही सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, “अम्मा का टिफिन” हा केवळ अन्नदानाचा उपक्रम नसून तो माणुसकी जपणारा आणि समाजातील दुर्बल घटकांच्या आयुष्यात आधार निर्माण करणारा उपक्रम आहे. कोणताही नागरिक उपाशी राहू नये, हीच आमच्या आईची इच्छा होती आणि त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अन्नासोबतच आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे असल्याने नियमित आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजातील गरजू घटकांच्या सेवेसाठी आपण कायम कटिबद्ध असून अशा सेवा उपक्रमांमधून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. आज पार पडलेल्या आरोग्य शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी करण्यात आली असून चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ३६० जणांची तपासणी करण्यात आली. या जिल्हा सामान्य रुग्णालय आणि नागपूर येथील रुग्णालयाने सेवा दिली.



