ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हाधिकाऱ्यांनी केली महाकाली मंदिर परिसराची पाहणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : चंद्रपूरची आराध्य दैवत असलेल्या माता महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेची पूर्वतयारी व इतर अनुषंगिक बाबींचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी माता महाकाली मंदिर परिसराची पाहणी करून संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, मनपा उपायुक्त संदीप चिद्रावार , माता महाकाली मंदिर विश्वस्त मंडळाचे सुनील महाकाळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, चंद्रपूर शहर महानगरपालिका व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, माता महाकाली यात्रेसाठी इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाविकांचा प्रवेश आणि बाहेर निघण्याचा मार्ग स्वतंत्र असावा. गर्दी व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन प्रशासनाने करावे. ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात यावे. यात्रा कालावधीत संपूर्ण मंदिर परिसराची साफसफाई नियमितपणे करावी. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी.

किचन स्थळ हे मंदिर परिसर आणि दुकानांच्या दूर ठेवावे. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात भाविकांना बसू देऊ नये. सर्वांनी रांगेत दर्शन घेऊन बाहेर निघावे. आरोग्य विभागाने प्रथोमपचार वैद्यकीय सेवा तसेच २४ तास रुग्णवाहिका व अग्निशमन सेवा उपलब्ध ठेवावी. बांधकाम विभागाने काही दुरुस्तीची कामे असल्यास आताच करून घ्यावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी घाट परिसराची सुद्धा पाहणी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये