ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
इतिहास विषयात प्राची रामचंद्र पोगुलवार (गांगुलवार) यांना पीएच.डी. पदवी

चांदा ब्लास्ट
चंद्रपुर : प्राची रामचंद्र पोगुलवार (गांगुलवार) यांना इतिहास विषयात पीएच.डी. (आचार्य) पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनी “नागपूरकर भोसले यांची प्रशासन व्यवस्था – एक ऐतिहासिक अध्ययन (इ.स. १७३० ते १८५४)” या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले आहे.
हे संशोधन कार्य त्यांनी प्रा. डॉ. गोविंद तिरमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले असून त्यांचा शोधप्रबंध संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे सादर करण्यात आला होता. विद्यापीठाने त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेऊन त्यांना इतिहास विषयातील पीएच.डी. (आचार्य) पदवी जाहीर केली आहे.
प्राची पोगुलवार यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



