ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सरदार पटेल महाविद्यालयाच्या करिअर कट्टा अंतर्गत पुरस्कार प्रदान

डॉ. पी. एम.काटकर यांना उत्कृष्ट प्राचार्यांचा प्रथम पुरस्काराने सन्मानित...

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम .काटकर यांना उत्कृष्ट प्राचार्यांचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. नुकतेच एका सोहळ्यात सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले.

नागपूर येथील कमला नेहरू महाविद्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र करिअर कट्टा यांच्यामार्फत आयोजित

नागपूर व गडचिरोली-चंद्रपूर विभागाचा विभागीय पुरस्कार सोहळ्यामध्ये येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांना मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने म्हणून सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदूस्थानी ठेवत सतत वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देत आहेत.’करिअर कट्टा’ मध्ये सुद्धा महाविद्यालयाच्या जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे. त्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे हे विशेष.

महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,करिअर कट्टा’ ची चमू व सतत सहयोग देणारे सर्वोदय शिक्षण मंडळ यांच्या सामूहिक प्रयत्नांची ही फलश्रुती असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांनी व्यक्त केले. त्यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जिनेश पटेल यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्यासह या उपक्रमाचे समन्वयक प्रा. संदेश पाथर्डे व डॉ. प्रकाश बोरकर यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये