ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्का ताई समाजोपयोगी व्यक्ती – हरीश शर्मा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती व अल्का आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर

पोंभुर्णा : क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री कुमारी अल्का आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र चिकित्सा तपासणी, शस्त्रक्रिया नोंदणी व मोफत चष्मे वाटप तसेच रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात परिसरातील नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. ज्यांना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांची नोंदणी करून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अनेक गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या शिबिरात सुमारे ७०० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून अनेक रुग्णांना शस्त्रक्रिया सुचविण्यात आली तसेच अनेकांना चष्मे देण्यात येणार आहेत.

या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवा देण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “अल्का ताई या समाजोपयोगी व्यक्ती असून त्या समाजसेवेच्या माध्यमातून लोकांशी नाते जपतात.”

अल्का आत्राम यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “माझा वाढदिवस गोरगरीब जनतेच्या सेवेत साजरा होतो, हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे.”

या कार्यक्रमाचे उद्घाटक भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा होते, तर अध्यक्षस्थानी पोंभुर्णा तहसीलदार मोहनीश शेळवटकर होते.

प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्ष सुलभा पीपरे, उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, रवींद्र मारपल्लीवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राखुडे सर, वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नाके सर, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक, ठाणेदार वंजारी सर, विनोद देशमुख (महामंत्री), यादव सर, काशीसिंह तुळशीराम, रोहनकर, पांडुरंग पाल, महेश रणदिवे, संजय कोडापे, नंदा कोटरंगे, शारदा गुरनुले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अल्का ताई मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संचालन अजय मस्के, प्रास्ताविक रवींद्र गेडाम यांनी केले तर आभार वैशाली बोलमवार यांनी मानले.

या शिबिराचा तालुक्यातील गोरगरीब नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला असून अल्का ताई मित्र परिवाराने सर्वांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये