पोलीस भरती लेखी परीक्षेबाबत महत्त्वाची सूचना
परीक्षार्थीना इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरास सक्त मनाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा पोलीस दलांतर्गत १३४ पोलीस शिपाई पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा असलेली लेखी परीक्षा रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० ते १२.३० वाजे पर्यन्त आयोजित करण्यात आली आहे.
ही परीक्षा सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत असलेल्या फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज येथे पार पडणार आहे. या परीक्षेसाठी १,२६३ पुरुष आणि ४४८ महिला उमेदवार पात्र ठरले आहेत.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदीः परीक्षेच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण (उदा. मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, डिजिटल घड्याळ, कॅल्क्युलेटर, ब्लू टूथ डिव्हाइस इ.) सोबत ठेवण्यास किंवा वापरण्यास सक्त बंदी आहे. अशा वस्तू परीक्षा केंद्रात आढळल्यास संबंधित उमेदवारावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.
सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या निश्चित वेळेच्या किमान दोन तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे अनिवार्य आहे.
उमेदवारांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वर्धा बस स्थानक सावंगी चौक सावंगी पोलीस स्टेशन मार्गे फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. परीक्षा केंद्राबाबत अधिक माहिती किंवा चौकशीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे मो. क्रमांक. 7304210724 किंवा प्रवीण शेंडे मो. क्रमांक, 9834104256 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
उमेदवारांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



