ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निप्पॉन प्रकल्पग्रस्तांनी संयम व समन्वय राखून सहकार्य करावे…. पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी

१४ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार न्यू. ग्रेटा, व न्यू. इरा क्लिंनटेक सोलुशन कंपनी चे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           तत्कालीन सरकारने सन १९९४ साली गाजावाजा करीत भद्रावती तालुक्यातील शेतजमिनी निप्पॉन ऊर्जा प्रकल्पाकरिता एमआयडीसी मार्फत अधिग्रहित केल्या होत्या. मात्र प्रदीर्घ काळ लोटूनही या जमिनीवर कोणताही उद्योग उभा राहू शकला नव्हता. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार सत्तारूढ होताच या जमिनींचे भिजते घोंगडे मार्गी लागून कोल गॅसिफिकेशन क्षेत्रातील न्यू. ग्रेटा व न्यू. इरा क्लिंनटेक सोलुशन कंपनी उभ्या राहू पाहत आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचा कोल गॅसिफिकेशन हा महत्वाकांक्षी प्रकल्प भद्रावती तालुक्यात होत असल्याने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. तद्वतच प्रचंड गुंतवणूक क्षमतेच्या या उद्योगामुळे जिल्ह्याला एक नवीन ओळख मिळून स्थानिक भद्रावती शहराला व्यवसाय, विकासाच्या, नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. सदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक १४ मार्च रोजी प्रकल्पाच्या जागेवर आयोजित करण्यात आला असून त्यादृष्टीने प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे.

 मात्र सदर प्रकल्प सुरू करण्यापूर्वी स्थानिक प्रस्थापित भूमिधारकांच्या सानुग्रह अनुदान, कायम स्वरुपी रोजगार व त्रिपक्षीय करार या मागण्या मंजूर करूनच प्रकल्प उभारला जावा याकरिता अनेक दिवसापासून निप्पॉन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने आंदोलने सुरू होती.

प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिस स्टेशन भद्रावती येथे पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून समन्वय राखण्याचे आवाहन केले. तसेच प्रकल्पग्रस्तांनी मागण्यांसंदर्भात घटनात्मक रीतीने कायदा व सुव्यवस्था राखून सहकार्य करावे. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या चर्चेत संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण सातपुते, देवराव खापणे, बंडू भादेकर,बापू सोयाम, बाबा तराळे, तेजकरण बदखल, अनुप खुटेमाटे आदी सह सर्व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

      राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगामी आगमन प्रसंगी कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यास परिसरातील सर्व नागरिक व निप्पॉन प्रकल्पग्रस्तांनी सहकार्य करावे. व्यक्ती पेक्षा कायदा मोठा असल्याने शांतता व सुव्यवस्था राखणे हे आमचे कर्तव्य आहे. घटनात्मक तरतुदींचा भंग होणार नाही याची खबरदारी घेऊनच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी या दौरा प्रसंगी संयम ठेवून सहकार्य करावे.

           योगेश्वर पारधी, पोलिस निरीक्षक भद्रावती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये