गुरुकुल महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दिनांक 10 मार्च 2026 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अनिल मुसळे, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, ग्रंथपाल प्रा. सचिन कर्णेवार, महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी, श्री प्रभू रामचंद्र विद्यालयाचे शिक्षक रुपेश विरुटकर, नदीम शेख, हेमंत बारसागडे, प्रवीण कुळसंगे, अरविंद कुचनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व माल्यार्पण करण्यात आले. यानंतर झालेल्या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अनिल मुसळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्त्री शिक्षण घेण्यावर समाजाने बंदी घातली होती. परंतु सावित्रीबाई फुले यांनी समाजविरोधात जाऊन अथक परिश्रमाद्वारे जुन्या चालीरीतींना झुगारून स्त्री शिक्षणाची दालने खुली केली. यासाठी त्यांना समाजाचा मोठा रोष पत्करावा लागला असे मत डॉ. अनिल मुसळे यांनी आपल्या उद्घाटनिय भाषणात व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. प्रशांत पुराणिक यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन कर्णेवार यांनी केले. आभार प्रदर्शन रुपेश विरुटकर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुकुल कला, वणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सुशांत खीरटकर, प्रफुल मुसळे, सविन मडावी, प्रशांत नवले, शालिक कांबळे, ननिता बुऱ्हाण आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



