ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिला बाईक रॅलीने पोंभुर्णा नगरी दुमदूमली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : जागतिक महिला दिनानिमित्त पोंभुर्णा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोंभुर्णा महिला कृती समितीच्या वतीने भव्य महिला बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत तालुक्यातील विविध जाती-धर्म, राजकीय पक्ष तसेच विविध शासकीय विभागांतील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

महिला कृती समितीच्या आवाहनानुसार “महिला म्हणून सहभागी व्हा” या संकल्पनेतून दरवर्षी महिला मोठ्या संख्येने एकत्र येत महिला दिन साजरा करतात. महिलांनी भूतकाळापासून आजपर्यंत केलेला संघर्षमय प्रवास आणि मिळवलेले यश याची आठवण करून देत महिलांनी कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत हा संदेश या बाईक रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.

यावर्षीच्या महिला दिनाची थीम ‘शेतकरी महिला’ असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी महिलाही कुठेच मागे नाहीत, असा संदेश रॅलीतून देण्यात आला.

रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे माजी सभापती अल्का आत्राम यांनी चालविलेली बुलेट. महिलांसाठी नेहमीच नवीन उपक्रम राबविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले.

या रॅलीमध्ये अल्का आत्राम (माजी सभापती), सुलभा पीपरे (नगराध्यक्ष), वैशाली बोलमवार, श्वेता वनकर, आकाशी गेडाम, पपीता पोलपोलवार, स्वाती खोब्रागडे, नेहा बुक्कावार, ज्योती बुक्कावार, शुभांगी कुत्तारमारे, वैशाली वासलवार, वैभवी श्रीकोंडावर, प्रणाली बोलमवार, ज्योत्स्ना मुरकुटे, मंगला माथाणकर, विमल वाकूडकर, अश्विनी चलाख, सविता नैताम, प्रीती बच्चूवार, नेहा तोडासे, अवनी मानकर, ऋतुजा राठोड, सुनीता सुळे, आरती बगळे, संजीवनी कोकाटे, पूजा कणसे, संजीवनी खामणकर, भाग्यश्री खोब्रागडे, आचल नागोसे, पूनम शेंडे, माधुरी नैताम, रुपाली दिवसे, राज्यश्री जांबुलवार, कोमल सांगिडवार, विना कुळमेथे यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये