ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरद पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात – जागतिक महिला दिन साजरा

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी.

प्रशांत बैद, चंद्रपूर

शरद पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग व अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘स्त्रीभ्रूण हत्या’ या विषयावर एक दिवसीय विद्यार्थी परिसंवादाचे आयोजन दिनांक 9 मार्च 2026 ला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात आले. होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्वात घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व आयोजिका डॉ. माया मसराम ह्या होत्या. तर मार्गदर्शक म्हणून प्रा. उज्वला जाणवे ह्या होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. अक्षता परसुटकर या विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमानिमित्त अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या आयोजिका डॉ.माया मसराम यांनी विद्यार्थ्यांना जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून सांगितले. स्त्री भ्रूणहत्या याला पुरुषा प्रमाणे महिलाही जबाबदार आहेत असे वक्तत्व त्यांनी केले.

महिलांनी, महिलांना सहकार्य करावे तेव्हाच संघटन निर्माण होईल असे विचार त्यांनी मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शारदा चाटारे हीने केले तर आभार जहीर शेख या विद्यार्थ्यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये