सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, तालुका पोंभूर्णा यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्थानिक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चौकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
कार्यक्रमात वक्त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी तसेच समाजातील दुर्बल व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या महान कार्याचा आढावा घेतला. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाज परिवर्तनाची दिशा देणाऱ्या त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुलभा पिपरे, माजी सभापती अल्का आत्राम, सुलभा ढोले, रजिया कुरेशी, मीराबाई ढोले, वैशाली मोहुर्ले, ज्योती गुरनुले, शकुंतला ढोले, अर्पिता ढोले, प्राची मोहुर्ले, शोभा कोहळे, महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष भुजंग ढोले, जगन कोहळे, नगरसेवक गणेश वासलवार, माजी सरपंच बंडू बुरांडे, विजय वासेकर, छत्रपती गुरनुले, गुलाब गुरनुले, गजानन मडावी, रवि ढोले, संतोष गुरनुले तसेच समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


