ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनिरुद्ध नक्षत्र इंटरनॅशनलतर्फे संरचित आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक शिक्षण प्रणालीची घोषणा

संस्थापक समीक्षा दरवलीकर यांनी सादर केली आंतरराष्ट्रीय टॅरो मास्टरी व प्रमाणपत्र प्रणाली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        अनिरुद्ध नक्षत्र इंटरननॅशनल या संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त, संशोधनाधारित आणि संरचित आध्यात्मिक शिक्षण प्रणालीच्या शुभारंभाची घोषणा केली आहे.

या संस्थेच्या संस्थापक समीक्षा दरवलीकर यांनी टॅरो, अंकशास्त्र आणि वैदिक ज्योतिष यांचा एकत्रित अभ्यासक्रम तयार करून आध्यात्मिक शिक्षणाला व्यावसायिक आणि शैक्षणिक स्वरूप दिले आहे.

संरचित आध्यात्मिक शिक्षणाचा नवा अध्यायया उपक्रमांतर्गत

७८ कार्डांचे वैज्ञानिक विश्लेषण प्रणाली सरळ (Upright) व उलट (Reversed) अर्थ प्रणाली,प्रेम, करिअर व आरोग्य यांसाठी स्वतंत्र अर्थमॉड्यूल

अंकशास्त्र व वैदिक ज्योतिष एकत्रीकरण व्यावसायिक क्लायंट हाताळणी प्रशिक्षण

आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र परीक्षा प्रणाली आदी संस्थेचे ध्येय आहे.

आध्यात्मिक ज्ञानाला शिस्तबद्ध, नैतिक आणि करिअराभिमुख स्वरूप देणे. आदी संस्थापकांचा दृष्टिकोन असून याबाबत

समीक्षा दरवलीकर म्हणतात:

“अध्यात्म हे केवळ श्रद्धेपुरते मर्यादित नसावे. अभ्यास, संशोधन आणि संरचना दिल्यास ते जीवनपरिवर्तनाचे सामर्थ्यवान साधन बनते.”

त्यांनी भारतीय प्राचीन ज्ञानपरंपरेला आधुनिक शैक्षणिक चौकटीत बसवून जागतिक स्तरावर सादर करण्याचा संकल्प केला आहे.

१. इंटरनॅशनल टॅरो ग्रँड मास्टर प्रमाणपत्र कोर्स

सखोल आणि प्रीमियम स्तरावरील प्रशिक्षण.

२. पुस्तक – “टॅरो रहस्यदीप”

७८ कार्डांचे सविस्तर विश्लेषण असलेले अधिकृत मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये