राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी पुकारलेल्या बंद मध्ये व्यापाऱ्याचाच बळी जातो तेव्हा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे
भारतातील कोणत्याही राज्यात, जिल्ह्यात,तालुक्यात व ग्राम पातळीवर काही रोष निर्माण करणाऱ्या घटना घडल्या की त्यामध्ये बाधितांना न्याय मिळावा यासाठी अनेकदा राजकीय पक्ष व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी यांचे वतीने त्या त्या भागात व्यापाऱ्यांना व्यवहार बंदचे आव्हान करण्यात येते.
यामध्ये प्रामुख्याने बळी जातो तो केवळ व्यापारी वर्गाचा बाधिताला न्याय मिळो अथवां ना मिळो मात्र व्यापारी आर्थिक ने भरडला जातो हे मात्र निश्चित याचबरोबर अनेकदा काही ठिकाणी चक्काजामचा अचानक निर्णय घेतला जातो राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग यावर काही वेळे करता आंदोलक पोलीस प्रशासनाच्या समक्ष चक्का जाम करण्यात येते हे करत असताना त्या मार्गावरून प्रवास करणारे एसटीतील प्रवासी किंवा महाविद्यालयातील विद्यार्थी हा वेळेवर त्याच्या निर्धारित ठिकाणी पोहोचू शकला नाही व त्याचा प्रवेश झाला नाहीतर याची काळजी कधी या आंदोलकांनी घेतली का? किंवा एखादा रुग्ण गंभीर आजाराने ग्रस्त आहे व त्याला वेळीच उपचार साठी संबंधित हॉस्पिटल मध्ये भरती करणे आवश्यक आहे व या चक्काजाम मध्ये जर तो अडकला व त्याच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर याची काळजी कधी या आंदोलकानी घेतली का? तसेच काही युवकांना नोकरीच्या निमित्ताने इंटरव्यू साठी संबंधित खाजगी कंपनीमध्ये जायचे आहे तो जर या चक्काजाम मुळे त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही व त्याची नोकरीची संधी गेली तर त्यांनी नैरश्यापोटी काही बरे वाईट केले तर याची सुद्धा काळजी ही आंदोलन करते घेतात का? एवढेच सोडा या आंदोलकांचे फक्त काम आहे ते फोटो सेशन करून दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात नाव आले की झालं यांच आंदोलन यशस्वी असे हे समजतात ज्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन करते आंदोलन करतात त्यानंतर त्यांनी त्या विषयाला कधी हात घातला का की नंतरच्या काळात या प्रकरनी संबंधीत बाधितास न्याय मिळाला की नाही त्या प्रकरणात कोणाविरुद्ध काय कारवाई झाली या बाबींशी संबंधित दोषी विरूद्ध काही कार्यवाही झाली या आंदोलकांना याचे काहीही घेणेदेणे नसते फक्त बंदची हाक घ्यायची व व्यापारी वर्गांना टार्गेट करायचे एवढेच आतापर्यंत पहावयास मिळाले आहे.हे कुठेतरी थांबले पाहिजे अन्यायाविरुद्ध न्याय जरूर मागितला पाहिजे.
मात्र हे करत असताना आपण कोणावर अन्याय तर करत नाही ना त्याचा विचार सुद्धा या आंदोलकानी करणे तेवढेच गरजेचे आहे ज्यांच्यावर अन्याय झाला किंवा काही कारणामुळे बाधित झाला तो स्वतः कधीच रस्त्यावर उतरून न्याय मागत नाही तो न्याय देवतेवर विश्वास ठेवून त्याच ठिकाणी न्यायची मागणी करतो हेही तेव्हढेच खरे आहे.



