ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दीनदयाल विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित दीनदयाल विद्यालय व कनिष्ठ कला आणि विज्ञान महाविद्यालय दे.राजा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

        या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य भगवानराव आरसोडे, होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक राजेशजी भिवटे, शिक्षक सुधाकरराव जायभाये, शिक्षिका भालेराव यांच्यासह सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या.

           कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत असतांना दंदाले यांनी आजची महिला ही विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असून महिलाचा सन्मान करणे हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी विद्यार्थीनी महिला शक्ती या आश्याची एक उत्कृष्ट नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

              या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन इयत्ता अकरावीच्या विद्यार्थीनी कु.पल्लवी कायंदे आणि कु.साक्षी जायभाये यांनी केले,कार्यक्रमाच्या आयोजिका शिक्षिका टाले यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला,तर शिक्षिका जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षिक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये