चंद्रपूर मनपा क्षेत्रात ४,९३० गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ अंतर्गत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. दिनांक १५ सप्टेंबर २०२६ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत झोननिहाय विसर्जनस्थळे, कृत्रिम विसर्जन कुंड तसेच फिरते विसर्जन कुंड उपलब्ध करून देण्यात आले. या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रात एकूण ४,९३० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
यामध्ये झोन क्र. १ (अ) – १,०१९, झोन क्र. १ (ब) – ४८९, झोन क्र. २ (अ) – १,२८१, झोन क्र. २ (ब) – १,१९२, झोन क्र. ३ (अ) – ६३३, झोन क्र. ३ (ब) – २२४ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तसेच फिरत्या विसर्जन कुंडाच्या माध्यमातून ९२ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
नदी, तलाव व जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी कृत्रिम विसर्जन कुंडांचा वापर करावा, तसेच निर्माल्य नदी-तलावात न टाकता निर्माल्य कलशात जमा करावे, याबाबत महानगरपालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात आली. पर्यावरणाचे संवर्धन, जलप्रदूषणास प्रतिबंध आणि स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महानगरपालिका प्रशासनास सहकार्य केले.



