शहर महानगरपालिकेतर्फे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ शहर महानगरपालिकेच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शहरातील हरित क्षेत्र वाढविणे, पर्यावरण संवर्धनास चालना देणे आणि नागरिकांमध्ये वृक्षारोपणाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता, नाना-नानी पार्क, बल्लारशाह बायपास रोड, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
“चला, आपण सर्व मिळून वृक्षारोपण करून हरित चंद्रपूरच्या दिशेने एक पाऊल टाकूया!” या संदेशातून नागरिकांना या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वृक्षारोपणामुळे शहरातील हरित क्षेत्र वाढण्यास, कार्बन उत्सर्जन कमी करण्यास, वातावरणातील तापमान नियंत्रित ठेवण्यास तसेच पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत होते. त्यामुळे चंद्रपूर शहर अधिक हिरवेगार, स्वच्छ व पर्यावरणपूरक बनविण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संकल्प करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून ‘हरित चंद्रपूर… समृद्ध चंद्रपूर…’ या संकल्पनेला बळकटी देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमास महापौर संगीता राजेंद्र खांडेकर, आयुक्त अकुनूरी नरेश (भाप्रसे), उपायुक्त संदीप चिद्रवार, उपायुक्त, शेषराव टाले, सभागृह नेता, सौ. जयश्री महेंद्र जुमडे, नगरसेविका (बाबूपेठ) सौ. लता भीमराव साव, सभापती झोन क्र. ३ रामनरेश यादव
नगरसेवक (बाबुपेठ) विनोद लभाणे, सभापती झोन क्र. १ रवी लोणकर, तसेच सहाय्यक आयुक्त झोन क्र. ३ राहुल पंचबुद्धे, सहाय्यक आयुक्त झोन क्र. १ श्रीमती क्षितिज जांभूळकर, उपअभियंता (यांत्रिकी) रवींद्र कळंबे, स्वच्छता अधिकारी डॉ. अमोल शेळके, सहा. अभियंता (उद्यान) चैतन्य चोरे, सहा. अभियंता (पाणी पुरवठा) सोनू थूल यांची उपस्थिती होती.



