आदर्श बाल गणेश मंडळाच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ आदर्श बाल गणेश मंडळ चोरा यांच्या वतीने व उपकेंद्र आयुष्यमान आरोग्य मंदिर, चोरा यांच्या सहकार्याने गावात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी माननीय वैद्यकीय अधिकारी डॉ.सय्यद मॅडम तसेच वैद्यकीय पदाधिकारी, परिचर वाय. पी. इखारे यांची प्रमुख उपस्थिती होती. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा व मार्गदर्शन देत आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जनजागृती केली.
शिबिराच्या आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष वैभव बावणे यांच्यासह दीपक नंदरधने प्रकाश जीवतोडे, लक्ष्मण चौधरी, उमेश मगरे, प्रमोद चौधरी, राहुल जांभुळे, गणेश वाघ, दादू गायकवाड, हस्तिक चौखे, शुभम चौधरी, रोहित ठाकरे आदी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मंडळाच्या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.



