सावलीचा राजा तर्फे रक्तदान आणि आरोग्य शिबीर संपन्न
28 वर्षांपासून सामाजिक बांधलकीचा संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली शहरात गेल्या २८ वर्षांपासून प्रतिष्ठापित होत असलेला ‘सावलीचा राजा’ गणेशोत्सव यंदाही भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत साजरा होत आहे. सावली तालुक्यातील सर्वात मोठी गणेशमूर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाकडे दरवर्षी हजारो गणेशभक्त आकर्षित होतात.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत मंडळाकडून केवळ धार्मिक कार्यक्रमच नव्हे, तर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांमुळे ‘सावलीचा राजा’ हा उत्सव परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सवाळीचा राजा च्या मंडपात रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून रक्तदान शिबीर घेण्यात आले त्यात 50 हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान दिले.तसेंच राष्ट्रीय आरोग्य अभियान शहरी आरोग्य वर्धेनी केंद्र सावली यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग शिबीर घेण्यात आले तेव्हा एकूण 88 व्यक्तीची आरोग्य तपासणी करून तपासणी दरम्यान बाधित रुग्णांना औषधी, गोळया देण्यात आले त्यांना औषध करून त्यांना अशा विविध उपक्रम घेऊन सावलीचा राजा युवा मंडळ यांनी तब्ब्ल 28 वर्ष पासून सामाजिक उपक्रम राबवित आहे त्यामुळे सदर मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



