ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स येथे दोन दिवसीय वर्कशॉप संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स येथे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व MSFDA यांच्या वतीने दोन दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. राजुरा कोरपणा व जिवती या तीन तालुक्यातील महाविद्यालयातील प्राध्यापक या कार्यशाळेला उपस्थित होते गोंडवाना विद्यापीठातर्फे तीन तालुक्याच्या महाविद्यालयाचे क्लस्टर म्हणून महात्मा गांधी इथे केंद्र प्राप्त झाले होते.

PM USHA अंतर्गत चालणाऱ्या या दोन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये एकूण आठ सत्र होते. आधुनिक शैक्षणिक संसाधने डिजिटल तंत्रे भारतीय ज्ञानपद्धती व शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित विषयावर दोन्ही दिवस तज्ञांच्या वतीने चर्चा करण्यात आली. MSFDA कडून प्रथम दिवशी श्री मिथिलेश भाकरे सर दुसऱ्या दिवशी श्री. प्रतीक धमाल प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते तसेच डॉ. विश्वजित पेंडसे, प्राचार्य, सिंधू महाविद्यालय, नागपूर व डॉ. प्रशांत ठाकरे समन्वयक PM- USHA गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांचेही सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचा विषय Capacity Building Workshop on Academic Bank of Credit and MEME असा होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शैलेंद्र देव सर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रामकृष्ण पटले, PM USHA चे समन्वयक व नोडल अधिकारी यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. पवन चटारे तर आभार प्रदर्शन डॉ. मनोहर बांद्रे यांनी केले. दोन्ही दिवस एकूण 50 प्राध्यापकांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून प्रशिक्षण समजून घेतले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये