ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि.प.शाळा कोडशी(खु)येथे शाळा व्यवस्थापन समिती गठित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 पंचायत समिती अंतर्गत कोरपना बीटातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी(खु)येथे शाळेचे मुख्याध्यापक कैलाश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समिती ची एकमताने निवड करण्यात आली.

शाळा व्यवस्थापन समिती निवड करताना प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रतिनिधित्व देण्यात आले.निवड करताना शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्वानुसार उपेक्षित गट आणि दुर्बल घटकातील पालकांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात आले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अर्चना वडे तर उपाध्यक्षपदी महेश बोरडे यांची निवड करण्यात आली.सदस्य म्हणून शशिकला कांबळे,प्रवीण पिदूरकर, दिक्षा मेश्राम, भावना ढोके,विजय टोगे, रजनी इटकलवार यांची निवड करण्यात आली.

शाळा व्यवस्थापन निवडीच्या वेळी शाळेच्या शिक्षिका पुष्पा सोयाम,महेश राठोड उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये