ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रभाग क्रमांक 01 मधील समस्यांची पाहणी

तातडीने कारवाईचे आश्वासन

चांदा ब्लास्ट

घुग्घुस नगर परिषदचे नियोजन, विकास व सांस्कृतिक सभापती रवीश विनय सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल यादववंशी यांनी सोमवार, दिनांक 10/02/2026 रोजी नगर परिषद कार्यालयाचे अधिकारी डांगोरे यांच्यासमवेत प्रभाग क्रमांक 01 अंतर्गत शास्त्री नगर, आंबेडकर नगर व शिवनगर परिसराचा दौरा करून विविध मूलभूत समस्यांची पाहणी केली.

पाहणीदरम्यान परिसरातील जीर्णावस्थेतील पाईपलाईन, नुकसानग्रस्त गटारे, सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था, खड्डेमय व तुटलेल्या रस्त्यांची स्थिती, स्वच्छतेचा अभाव तसेच वाढलेले झुडपी जंगल यांचा आढावा घेण्यात आला. स्थानिक नागरिकांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.

अधिकारी डांगोरे यांनी संबंधित समस्यांची बिंदूनिहाय नोंद केली तसेच स्थळांचे छायाचित्रणही केले. सर्व समस्यांवर तातडीने कारवाई करण्यात येईल व आवश्यक कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.

या पाहणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांना लवकरच दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये