ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हयातील १३४ पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी भरती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस शिपाई भरती २०२४-२५ संबंधाने वर्धा जिल्हयातील १३४ पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी (पुरुष व महिला पोलीस शिपाई) पोलीस भरती श्री. सौरभकुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे अधिपत्याखाली आयोजित करण्यात आली आहे. पोलीस भरती प्रक्रिया दि. ११ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ पावेतो भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.

ही भरती प्रक्रीया एकूण १३४ रिक्त पदांकरीता होत असुन त्याकरीता पुरुष उमेदवार ५,३९९, महिला उमेदवार: १,९१३ व तृतीयपंथी उमेदवार ०१ असे एकुण ७३१३ अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी दररोज सुमारे ७०० ते ८०० उमेदवारांना शारीरीक चाचणी करीता पोलीस मुख्यालय, वर्धा येथील मैदानावर बोलाविण्यात येत आहे. उमेदवारांना दररोज सकाळी ५:०० वाजता मैदानावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून संगणकीय नोंदणी करण्यात येत असून त्यानंतर लगेच प्रत्यक्ष शारीरिक चाचणीला सुरुवात करण्यात येत आहे. १०० मीटर धावण्याची चाचणी पोलीस मुख्यालय येथील मैदानावर, ८०० मोटर व १६०० मीटर धावण्याची चाचणी सेवाधाम उङ्गमापुल ते दत्तपुर टी पॉइंट बायपास रोडवर या ठिकाणी घेण्यात येत आहे व त्याठिकाणी उमेदवारांना पोलीस मुख्यालय येथुन ने-आण करीता पोलीस वाहन उपलब्ध करण्यात आले आहे.

भरती प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावी यासाठी खालील उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

संपूर्ण मैदान परिसरात CCTV कॅमेरे आणि व्हिडिओ कैमेप्यांद्वारे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. धावण्याच्या चापणीमध्ये मैरानावर अधुक पारदशी करीता आरएफआयडी लावण्यात आले आहे. भरती प्रक्रियेच्या देखरेखीसाठी ७० पोलीस अधिकारी व ४०० पोलीस अंमलदार असे एकूण ४७० पोलीस तैनात करण्यात आले आहे.

उमेदवारांना गैरसोय होऊ नये म्हणून मैदानाजवळच जेवण, नाश्ता, शेरॉक्स मशीन, फोटोग्राफरची व्यवस्था माफक दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुवीधा, अम्बुलंस, ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेट, कचराकुंडीची सोय करण्यात आली आहे.

बाहेर जिल्ह्यांतून येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांचे निवासाची व्यवस्था महात्मा लीन (नालवाडी), महादेव मंदिर (महादेवपुरा), तुकाराम मठ (रामनगर) वाठिकाणी करण्यात आली आहे व त्याठिकाणी समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहे. पोलीस भरती दरम्यान दिनांक ११.०२.२०२६ ते २३.०२.२०२६ या कालावधीमध्ये सकाळी ४.०० ते सायंकाळी ५.०० वा. पर्यंत सेवाग्राम उड्डाणपुल ते दसपुर टी पॉइंट बायपास रोड या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात येत असून या मार्गाने येणारी- जाणारी वाहतुक दत्तपुर टी पॉईटकडून सेवाधामकडे दसपुर टी पॉइंट नालवाडीरोड गोपूरी रोड रेस्ट हाऊस महात्मा गांधी पुतळा सेवाग्राम उरुणमार्ग सेवाधाम, बाप्रमाणे कळविण्यात येत आहे.

जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया दरम्यान वाहतुक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करीता सर्व नागरिकांनी बर नमुद मार्गाचा अवलंच करून पोलीसांना सहकार्य करावे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये